वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
वरोरा नगरपरिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या स्वच्छता आणि कचरा वाहतुकीच्या निविदेत (Tender) मोठा घोळ असल्याचा आरोप करत भाजपचे नगरसेवक तथा गटनेते अक्षय दिलीप भिवदरे यांनी प्रशासनाविरुद्ध शड्डू ठोकला आहे. ही निविदा प्रक्रिया पारदर्शक नसून ती केवळ जुन्याच कंत्राटदाराच्या फायद्यासाठी तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी मुख्यधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केला आहे.
-: नेमका विषय काय :-
नगरपरिषद वरोरा अंतर्गत ‘Cleaning of Drains, Transportation of Collected Waste to SWM Site, Insecticides Spray’ या कामासाठी सुमारे १ कोटी १७ लाख ८५ हजार ६३९ रुपयांची* निविदा काढण्यात आली आहे. मात्र, या निविदेतील अटी व शर्ती या अतिशय संशयास्पद असल्याचे भिंवदरे यांचे म्हणणे आहे.
पत्रातील मुख्य व आक्रमक मुद्दे :- जुन्या कंत्राटदाराला ‘रेड कार्पेट’ निविदेतील अटी या केवळ पूर्वीच्या कंत्राटदाराच्या कार्यपद्धतीला डोळ्यासमोर ठेवूनच बनवण्यात आल्या आहेत. यामुळे नवीन कंत्राटदारांना या प्रक्रियेत सहभागी होणे अशक्य झाले आहे.
निवडक जाचक अटी :- निविदा क्र. ३ मधील लिफाफा क्र. १ अंतर्गत असलेल्या अटी क्रमांक ७, ८, ९, ११, १२, १५ व १७* या विशेषतः अशा प्रकारे तयार केल्या आहेत की, त्यामध्ये केवळ जुनाच कंत्राटदार पात्र ठरेल.
प्रशासनाच्या भूमिकेवर संशय : – या जाचक अटींमुळे निरोगी स्पर्धा (Competitive process) बाद झाली असून, प्रशासनाकडून जुन्या कंत्राटदाराला ‘अप्रत्यक्ष सहकार्य’ मिळत असल्याचा संशय भिंवदरे यांनी व्यक्त केला आहे.
न्याय हक्काची पायमल्ली या प्रकारामुळे नवीन इच्छुक आणि पात्र कंत्राटदारांना समान संधी नाकारली जात असून, हा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मोठा अन्याय आहे.
आता थेट ‘फेरनिविदा’ काढण्याची मागणी
अक्षय भिवदरे यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट इशारा दिला आहे की, सदर निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी. सर्व कंत्राटदारांना समान संधी मिळेल अशा सुधारित आणि पारदर्शक अटींसह ‘फेरनिविदा’ (Re-Tender) काढण्यात यावी.
👉 “जर प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन पारदर्शक प्रक्रिया राबवली नाही, तर हा लढा अधिक तीव्र केला जाईल,” असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती आमदार श्री. करणदादा देवतळे आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. आता यावर नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




