वरोरा :- लोकशिक्षण संस्थेद्वारे संचालित,लोकमान्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीदान व वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक 11 एप्रिल 2026 रोज शनिवारला आयोजित करण्यात आला..या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. श्रीकांतजी पाटील (अध्यक्ष, लोकशिक्षण संस्था, वरोरा) होते व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मृणाल काळे(प्राचार्य, आनंदनिकेतन महाविद्यालय, वरोरा) होते.तर स्वागताध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य, डॉ. जयश्री शास्त्री उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. मृणाल काळे यांनी मार्गदर्शनात” आज सार्वजनिक क्षेत्राच्या तुलनेत खाजगी क्षेत्रात नोकरीच्या संधी जास्त आहे व इंग्रजी बोलण्याचे महत्व दोन्ही क्षेत्रात सारखेच महत्त्वाचे आहे.त्यामुळे कौशल्य व भाषेच्या अनुषंगाने लक्ष देऊन आपण रोजगार देणारे अधिक बना.” असे मत मांडले. तसेंच या पदवीदान व वार्षिक बक्षीस वितरण समारोह प्रसंगी प्रा. श्रीकांतजी पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात “समाजाचे आरोग्य विवेकशीलतेने सुधारते आणि विवेक शिक्षणानी समृद्ध होतो.” या अनुषंगाने मत मांडले.तर कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष डॉ. जयश्री शास्त्री यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तीमत्व विकासासाठी महाविद्यालयाद्वारा आयोजित विविध उपक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन केले व सर्वांचे कौतुक केले.
या कार्यक्रमात विविध स्पर्धेत क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या 12 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कु. निशा विक्रम कौरासे यांना उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून तर कु.शिवानी संदीप पहापळे यांना उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून गौरव करण्यात आला.तसेच पदवीदान कार्यक्रमातून पदवी तसेच राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ प्रमाणपत्र स्वयंसेविकांना वितरित करण्यात आले.यश प्राप्त तसेच इतरही विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रजनीगंधा खिरटकर डॉ.श्रीकांत पुरी,डॉ. रवींद्र शेंडे,प्रा.उत्तम देऊळकर,प्रा.हिमगौरी देशपांडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ. श्रीनिवास पिलगुलवार यांनी मानले.या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण,स्वागतगीत,विद्यापीठ गीताने झाली तर कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम या सामूहिक गीताने झाला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळाले.
🙏 जय विदर्भ 🙏




