Home जिल्हा नंदोरी येथे ‘शासन आपल्या दारी’ शिबिर; वीस गावांतील शेतकऱ्यांच्या समस्या गावातच मार्गी

नंदोरी येथे ‘शासन आपल्या दारी’ शिबिर; वीस गावांतील शेतकऱ्यांच्या समस्या गावातच मार्गी

 

वरोरा :- दिनांक ७ मार्च २०२६ रोजी नंदोरी येथे वीस गावांकरिता ‘शासन आपल्या दारी’ तसेच छत्रपती शिवाजी महाराज राज्य स्वअभियान अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती आणि सेवा थेट गावातच मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला.

या शिबिरात शासनाच्या विविध विभागांनी नंदोरी येथे स्वतंत्र स्टॉल उभारून ग्रामस्थांच्या समस्या तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला. सातबारा, जमीन नोंद, पीकविमा, कृषी योजनांची माहिती, महिला व बालकल्याण योजना, विविध दाखले, तसेच इतर प्रशासकीय कामे याठिकाणीच पूर्ण करण्यात आली.

शिबिराला उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सर्व नायब तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, महिला व बालकल्याण विकास अधिकारी, भूमिअभिलेख विभाग, मुद्रांक व नोंदणी विभाग, पोलीस स्टेशन तसेच इतर शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी दिवसभर उपस्थित होते. त्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी ऐकून अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावले.

या उपक्रमामुळे वीस गावांतील शेतकरी व नागरिकांना तालुका किंवा जिल्हा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या नाहीत. शासकीय सेवा थेट गावात उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारचे उपक्रम वारंवार राबविण्यात यावेत, अशी मागणीही शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात आली.

जय विदर्भ