आज सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुरवणी मागण्यांवर बोलताना वरोरा–भद्रावती मतदारसंघातील आरोग्य विषयक गंभीर प्रश्न ठामपणे मांडले.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार मानधन देणे, त्यांचे कायमस्वरूपी समायोजन करणे, तसेच सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्याची मागणी केली. ग्रामीण व तालुका रुग्णालयांमध्ये रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता अधोरेखित केली.वरोरा व भद्रावती येथे अद्याप अर्बन पब्लिक हेल्थ सेंटर नसल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या. ट्रामा केअर युनिटसाठी डॉक्टर व स्टाफची तातडीने नियुक्ती करावी, औषधे व वैद्यकीय साहित्याची उपलब्धता वाढवावी, तसेच बोर्डा, जामगाव खुर्द, खेमजेई व आनंदवन परिसरात नवीन उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली.कुष्ठरोग व हत्तीरोगग्रस्त रुग्णांच्या पुनर्वसन व आर्थिक मदतीसाठी विशेष तरतूद करण्याचीही ठाम भूमिका मांडली.जनतेच्या आरोग्याचा प्रश्न हा केवळ आकड्यांचा विषय नाही, तर तो जीवनाशी निगडित आहे — आणि यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत, हीच मागणी.कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना किमान वेतन, त्यांचे समायोजन, सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन तसेच रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली.वरोरा व भद्रावती येथे अर्बन पब्लिक हेल्थ सेंटरची गरज अधोरेखित करत ट्रामा केअर युनिटमध्ये पूर्णवेळ डॉक्टर व स्टाफ नियुक्त करण्याची मागणी केली. तसेच रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी एमआरआय व सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्याची ठाम मागणी सभागृहात केली.ग्रामीण भागात नवीन उपकेंद्रे सुरू करणे, औषधसाठा वाढवणे तसेच कुष्ठरोग व हत्तीरोगग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही भूमिका मांडली.जनतेच्या आरोग्यासाठी कोणतीही तडजोड नाही — हा निर्धार पुन्हा स्पष्ट केला.वरोरा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सिमेंट कारखाने व कोळसा खाणी असून वरोरा शहर महामार्गालगत असल्यामुळे अपघातांची संख्या लक्षणीय आहे. अपघातग्रस्त रुग्णांना रुग्णालयात आणल्यानंतर पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तातडीचे उपचार देताना अडचणी निर्माण होत आहेत.पाच वर्षांपूर्वी ट्रामा केअर युनिटची उभारणी करण्यात आली; मात्र आजपर्यंत त्या ठिकाणी पूर्णवेळ डॉक्टर व आवश्यक स्टाफची नियुक्ती झालेली नाही. इमारत वापराअभावी निष्क्रिय पडून आहे, ज्यामुळे शासनाचा खर्च वाया जात आहे.लवकरात लवकर ट्रामा केअर युनिटसाठी डॉक्टर व कर्मचारी नियुक्त करून अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा कार्यान्वित कराव्यात, जेणेकरून अपघातग्रस्त व गरजू रुग्णांना तातडीने आणि दर्जेदार उपचार मिळू शकतील — ही शासनाकडे आग्रही मागणी.मतदारसंघाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता अनेक ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत व मूलभूत आरोग्य सेवा गावपातळीवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी संबंधित भागांत तातडीने नवीन आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती करणे अत्यावश्यक आहे.ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, ही आग्रही मागणी केली.




