Home जिल्हा अज्ञान,अंधश्रद्धा, अस्वच्छतेविरुद्ध आयुष्यभर संदेश देणाऱ्या महान समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या 150...

अज्ञान,अंधश्रद्धा, अस्वच्छतेविरुद्ध आयुष्यभर संदेश देणाऱ्या महान समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधनाचा सुंदर संदेश देणारा उपक्रम वरोरात पाहायला मिळाला

श्री संत गाडगेबाबा की जय!अज्ञान, अंधश्रद्धा आन् अस्वच्छतेविरुद्ध आयुष्यभर झगडलेले महान समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त समाजप्रबोधनाचा सुंदर संदेश देणारा उपक्रम वरोरात पाहायला मिळाला.

श्री संत गाडगे बाबा शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, वरोरा यांच्या तर्फे आनंदवन हॉस्पिटल येथे रुग्णांना आन् गरजू बांधवांना फळ वाटप करून गाडगेबाबांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजाला सेवा, स्वच्छता आन् मानवतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकरजी रोहनकर साहेब, विलासभाऊ नेरकर, आनंदवनचे डॉ. विजय पोळ साहेब, संस्थेचे अध्यक्ष अतुलभाऊ क्षीरसागर, किशोरभाऊ केळझळकर, अनिकेतजी नाकाडे (भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष), अशोकरावजी भोयरकर साहेब, भैय्याजी तुराणकर सर, घोलप सर, बंडूजी ताजने, अशोकरावजी चिंचोलकर तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि धोबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात गाडगेबाबांच्या कार्याची आठवण करून देत समाजाला स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आन् शिक्षण यांचा संदेश देण्यात आला. “समाज बदलायचा असेल तर प्रत्येकाने पुढे येऊन काम करायला पाहिजे,” असा संदेशही उपस्थितांनी दिला.

शेवटी श्री संत गाडगे बाबा शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, वरोरा यांच्या वतीने महान संताला १५० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले आन् त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

☎️ 9673574711

☎️ 8329889732