वरोरा : शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील वीजदाब कमी होणे आणि वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे या समस्येमुळे नागरिक व व्यापारी त्रस्त झाले होते. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत स्वप्नील देवाळकर यांनी संबंधित विभागाकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
देवाळकर यांच्या निवेदनाची दखल घेत यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे (महावितरण) वरोरा विभागाने बाजार वॉर्डातील नेहरू चौक येथे नवीन २०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्याचा निर्णय घेतला व काम पूर्ण केले.
मध्य मार्केट परिसरात वाढता वीजभार लक्षात घेता हे रोहित्र अत्यंत आवश्यक झाले होते. नवीन रोहित्र कार्यान्वित झाल्याने वीजदाब स्थिर राहणार असून दुकाने, व्यावसायिक आस्थापना तसेच घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्वप्नील देवाळकर यांनी नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या, तर आ. करणदादा देवतळे यांनी त्या प्रश्नावर ठोस पाठपुरावा करून तो मार्गी लावला. दोघांच्या समन्वयातून बाजार वॉर्डातील दीर्घकालीन वीजप्रश्न सुटल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

आमदार करणदादा देवतळे यांना दिलेले निवेदन




