मुल प्रतिनिधी :-समाजसेवेची अखंड आवड आणि सातत्यपूर्ण कार्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या शिवसेना महिला जिल्हा प्रमुख चंद्रपूर भारती राखडे यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान भारत सरकार आणि निती आयोग नोंदणीकृत ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समिती तर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आला.
याचबरोबर, भारती राखडे यांची ग्राहक रक्षक समिती चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ही निवड समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. आशाताई पाटील (नाशिक) यांनी केली असून, यासंदर्भातील निवडपत्र त्यांना प्राप्त झाले आहे.
या पुरस्काराचा वितरण समारंभ दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेलिब्रिटी हॉटेल, अंध शाळा बसस्टॉप, समर्थ बाजारजवळ, नाशिक रोड, नाशिक येथे पार पडला.
या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांमध्ये संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त, नाशिक), सीमाताई महेश हिरे (आमदार), देवयानीताई फरांदे (आमदार), कल्याणराव पाटील (आमदार), मनोरमा पाटील (समाजसेविका), संदीप सोनवणे (संस्थापक, कडकनाथ ऍग्रो वर्ल्ड), अजय बोरस्ते (शिवसेना उपनेता, नगरसेवक), सुधीर तांबे (माजी विधानपरिषद सदस्य), महेश चौधरी (सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक), मंदाकिनी भोसले (अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण आयोग, नाशिक), अनिल गिरनारे (वैध मापन शास्त्र उपनिबंधक, नाशिक), आणि डॉ. यु. के. शर्मा (पर्यावरण तज्ञ) यांचा समावेश होता.
भारती राखडे यांना मिळालेल्या या सन्मानामुळे मुल तालुक्यासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव समाजसेवेसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
जय विदर्भ
बातमी व जाहीरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️8329889732




