Home जिल्हा ⭕🙏 आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पुढाकार गायत्री शक्तीपीठ...

⭕🙏 आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पुढाकार गायत्री शक्तीपीठ परिसराच्या विकासासाठी रस्ते,पार्किंग व सौंदर्य करण्याचे निर्देश 🙏⭕

 

चंद्रपूर  : – अभिषेक भागडे
चंद्रपूर शहराचा सुसज्ज, आधुनिक आणि सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ठोस पावले उचलली आहेत. या अनुषंगाने त्यांनी दाताळा येथील श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठ परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत विकासकामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच शक्तिपीठ परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी रस्ते, पार्किंग व्यवस्था, सौंदर्यकरण आणि परिसर विकासाच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

चौपदरी रस्ता, भव्य पार्किंग व आकर्षक सौंदर्यकरण

दाताळा येथील श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, मंदिर परिसराचे सौंदर्यकरण तसेच गायत्री परिवाराच्या संकल्पनेनुसार बगीचा उभारण्याचे निर्देश नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. विजय इंगोले यांना देण्यात आले. या कामांमुळे परिसर अधिक आकर्षक होऊन भाविकांसाठी सुविधा वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ऑक्सिजन पार्क, गार्डन व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा

म्हाडाच्या सुमारे १७ हेक्टर खुल्या जागेत मुलांसाठी खेळण्याचे गार्डन, ऑक्सिजन पार्क, वृद्धांसाठी बसण्याची व्यवस्था तसेच अंतर्गत रस्ते उभारण्यासाठी आवश्यक निधी शासनस्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आ. मुनगंटीवार यांनी दिले.

पोलिस गृहनिर्माण व प्रशिक्षण केंद्रासाठी निधीचा पाठपुरावा

चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिसांसाठी गृहनिर्माण व प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी आवश्यक निधी येत्या मार्च महिन्यापर्यंत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाशी समन्वय साधून शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर रोड ते देवाडा शिव रस्त्याबाबत महत्त्वाच्या सूचना

नागपूर रोड ते देवाडा शिव दरम्यान ३० मीटर रुंदीचा व सुमारे ४.५ किलोमीटर लांबीचा रस्ता उभारण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. हा रस्ता परिसराच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या पाहणी दौऱ्यात नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. विजय इंगोले, म्हाडा व बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच गायत्री परिवाराचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गायत्री परिवाराच्या वतीने आ. मुनगंटीवार यांचे आभार मानण्यात आले.

🙏जय विदर्भ 🙏

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.

☎️ 9673574711

☎️8329889832