वरोरा–✍️ अभिषेक भागडे
वरोरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. मायाताई रमेश राजूरकर (वरोरा) तसेच भद्रावती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिलजी धानोरकर आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे वरोरा–भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करणजी देवतळे यांच्या गतवर्षभरातील विकासकामांचा समावेश असलेल्या ‘वार्षिक कार्य अहवाल’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
सभेस आमदार करणजी देवतळे, निवडणूक प्रभारी भगवानजी गायकवाड, रमेशजी राजूरकर, अशोकजी जिवतोडे, शंभूनाथजी वरघणे, विजयजी देवतळे, बाबा भागडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली.
विकासाचा निर्धार अधिक दृढ करणारी व आगामी निवडणुकीत विजयी संकल्पाला मजबुती देणारी ही सभा सर्वार्थाने यशस्वी ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.—🙏 जय विदर्भ🙏— ( बातमी आणि जाहिराती करिता संपर्क साधा. ☎️ 9673574711 ☎️ 8329889732 )




