माननीय हंसराजजी अहीर (अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग – भारत सरकार)व वरोरा- भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे आमदार करन जी देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, विभागीय आयुक्त नागपूर व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.
अरविंदो इन्फ्रा लि. व कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लि. (KPCL) संदर्भात मागास प्रवर्ग व प्रकल्पग्रस्तांच्या विविध तक्रारींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत पुनर्वसन, आर्थिक मोबदला, नोकरी, वेतन, तसेच खनन कार्यातील सुरक्षा यांसारख्या विषयांवर प्रशासनाकडून सविस्तर आढावा घेण्यात आला.
प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी घेतलेले हे आणखी एक ठोस पाऊल! 🙏जय विदर्भ🙏





