Home विदर्भ Nagpur Accident News : नागपुरात भरधाव ट्रकने सोडला जीवघेणा धूर

Nagpur Accident News : नागपुरात भरधाव ट्रकने सोडला जीवघेणा धूर

नागपुरात भरधाव ट्रकने सोडला जीवघेणा धूर
a-speeding-truck-released-deadly-fumes-in-nagpur

लॉ कॉलेज चौक ते सेमिनरी हिल्स मार्गावरील प्रकार

नागपुर (Nagpur) :- नागपुरातील लॉ कॉलेज चौक ते सेमिनरी हिल्स मार्गावर रविवारी एक माती भरलेला ट्रक भरधाव वेगाने धावत असल्याचे दिसून आले. ट्रक मोठ्या प्रमाणावर धुरळा उडवत होता, त्यामुळे परिसरात प्रदूषणाचे प्रमाण वाढले आणि रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अक्षरशः रस्त्याच्या कडेला थांबून वाहन थांबवावे लागले. या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.

हा ट्रक नागपुरातील पोलीस विभाग आणि शासकीय कार्यालयांसमोरून जाताना कोणत्याही नियमांचे पालन करत नव्हता. विशेषतः आमदार निवासजवळील सिग्नल देखील या ट्रकचालकाने तोडला. हा प्रकार एका चौकस नागरिकाने आपल्या चारचाकी वाहनातून मोबाईल कॅमेराद्वारे रेकॉर्ड केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा ट्रक पोलीस विभाग आणि शासकीय कार्यालयासमोरून जात असताना कोणत्याही अधिकाऱ्याने त्याला अडवले नाही. इतकेच नव्हे, या प्रकारामुळे मोठा अपघात घडला असता. ट्रकच्या भरधाव वेगामुळे इतर वाहनधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. तसेच, मोठ्या प्रमाणावर धुरळा उडाल्याने नागरिकांना श्वसनासंबंधित त्रास होण्याची शक्यता होती. या घटनेनंतर “अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते,” अशी मागणी केली जात आहे. अवैधरीत्या वेगाने चालणारी वाहने आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे. या प्रकरणी स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाकडून कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Nagpur weather
Nagpur is famous for
Nagpur which state
Nagpur map
Nagpur Pin code
Nagpur city population
Nagpur in which state in Map
Nagpur GDP in billion