Home Breaking News लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट;जाणून घ्या नेमकं काय मिळणार ?

लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट;जाणून घ्या नेमकं काय मिळणार ?

डिसेम्बर महिन्यापासून मिळणार २१००रुपये

मुंबई (Mumbai) :- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर विजय मिळाला आहे. या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी सुरु झाली आहे. राज्यभरातील 13 लाख महिलांना हे रिटर्न गिफ्ट मिळणार आहे. या महिलांचे अर्ज बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे प्रलंबित होते. परंतु आता त्यांचे अर्ज मंजूर करण्यात येणार आहे. राज्यातील 2.34 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहे. त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये सरकारतर्फे दिले जात आहे. ही रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील 2.34 कोटी महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेसाठी आलेल्या 13 लाख बहिणींचे अर्ज प्रलंबित होते. ते अर्जही आता निकाली काढण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यांपासून त्यांना रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्राच्या माझी लाडकी बहिन योजनेंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते जारी करण्यात आले असून राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नोव्हेंबरमध्ये योजनेचा अखेरचा हप्ता देण्यात आला होता. तर आता पुढील हप्ता कधी येईल आणि किती पैसे मिळतील यालकडे लाडक्या बहिणींची नजर लागून आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून महायुती आघाडीला बहुमत मिळाले आणि भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील महिला सर्वाधिक खूश असतील कारण आता लाडली बहीण योजनेतील रक्कम वाढणार आहे. निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या जाहीरनाम्यात याबाबत उल्लेख होता.

Mumbai Indian
Mumbai City
Mumbai map
Mumbai News
Mumbai district Name
Breaking News Mumbai Today Live
News Today Mumbai
Mumbai Indians cricket