Home जिल्हा New CM Of Delhi : आतिशी होणार दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री

New CM Of Delhi : आतिशी होणार दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री

 

विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव

केजरीवाल सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेल्या आतिशी या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असतील. अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. आतिशी यांच्या नावाची लवकरच घोषणा केली जाईल. दुपारी 4:30 वाजता केजरीवाल लेफ्टनंट गव्हर्नर विनय सक्सेना यांच्याकडे राजीनामा सोपवतील आणि नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव सांगतील.

नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधीही याच आठवड्यात होणार आहे.26 आणि 27 सप्टेंबर रोजी विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. व 13 सप्टेंबरला मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी 15 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते, ‘मी प्रामाणिक की बेईमान हे आता जनतेने ठरवावे. जनतेने हा डाग धुवून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला तर मी पुन्हा खुर्चीवर बसेन

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आतिशी (Atishi Singh) यांचं नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होतं. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या विश्वासू नेत्या अशी आतिशी मार्लेना यांची ओळख आहे. महिला असणं आणि मंत्री असणं या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात ज्या महिला मंत्र्यांकडे सर्वाधिक खाती आहेत त्यापैकी आतिशी या एक आहेत. आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर विधानसभा निवडणुकीसाठीचा आपचा जाहीरनामा आतिशी यांनी तयार केला होता.

महिला व बालविकास, शिक्षण, पर्यटन, कला, संस्कृती व भाषा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज या विभागांचा समावेश आहे. महिला मतांची बँक आकर्षित करण्यासाठी आतिशी  यांच्या नावाचा पक्षाने विचार केला असावा. याशिवाय विरोधकांना महिला मुख्यमंत्र्यावर टीका करणं अडचणीचं ठरणार आहे त्यामुळेही हा निर्णय झाला असावा अशी चर्चा आहे.

Atishi Marlena husband
Atishi Marlena husband Praveen Singh
Delhi Chief Minister
Atishi Marlena Education
Atishi Marlena children
Atishi Marlena sister
Is Atishi Marlena married
Vijay Singh and Tripta Wahi