Home महाराष्ट्र Chief Minister Eknath Shinde : लाडक्या भावांसाठीही योजना

Chief Minister Eknath Shinde : लाडक्या भावांसाठीही योजना

Chief Minister Eknath Shinde : लाडक्या भावांसाठीही योजना
Chief Minister Eknath Shinde : Ladka Bhau yojna

12 वी झालेल्यांना महिन्याला 6 हजार

Scheme for youth :- लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पंढरपुरात केली आहे. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार, डिप्लोमा 8 आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्या वेतन देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते पंढरीच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा झाली. येथील कृषी पंढरी 2024 प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. राम कृष्ण हरी, बोला पुंडलिका वरद हरी श्री ज्ञानदेव तुकाराम .असे म्हणत भाषणाला सुरुवात केली. तसेच, पंढरपूरच्या वारीसाठी येणाऱ्या बसला अपघात झाल्यामुळे, मी डोंबिवलीत जाऊन अपघातातील जखमींची भेट घेऊन आलो. तसेच, डॉक्टरांना सूचनाही केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर, लाडकी बहीण योजनेवर भाष्य करत लाडक्या भावांसाठीही योजना असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री ‘लाडका भाऊ’ योजनेअंतर्गत १२ वी पास झालेल्या तरूणांना दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘लाडका भाऊ’ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

‘लाडका भाऊ’ योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रं आवश्यक?

  • आधार कार्ड
  • निवास प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • वय प्रमाणपत्र
  • चालक परवाना
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • बँक खाते पासबुक
  • ई-मेल आयडी