Home विदर्भ Surrender of the Naxals : गडचिरोलीत दोन जहाल महिला

Surrender of the Naxals : गडचिरोलीत दोन जहाल महिला

Surrender of the Naxals : गडचिरोलीत दोन जहाल महिला
Surrender of the Naxals : गडचिरोलीत दोन जहाल महिला

गडचिरोली(Gadchiroli)11जुलै :- गडचिरोली येथे आज, गुरुवारी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. प्रतिमाला सुखराम बोगा उर्फ मंजूबाई आणि अखिला संकेर पुडो उर्फरत्नमाला उर्फ आरती अशी या नक्षलवाद्यांची नावे आहेत. महाराष्ट्रशासनाने त्यांच्यावर प्रत्यक्ष 8 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. प्रमिलावर आजपर्यंत एकुण 40 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 20 चकमक, 02 जाळपोळ, व 18-इतर गुन्ह्रांचा समावेश आहे. तर अखिला संकेर पुडो हिच्यावर एकूण 7 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 02- चकमक, 04- खून, व 01- इतर गुन्ह्रांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने दोघींनाही आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षिस जाहिर केले आहे.

शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 668 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. (Surrender of the Naxals) गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 21 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ,नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. जसवीर सिंग, कमांण्डट
113 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

Gadchiroli in marathi
Why Gadchiroli is dangerous
Gadchiroli is famous for
Gadchiroli Map
Gadchiroli district Information
Gadchiroli Collector Name list
Is Gadchiroli safe
www.gadchiroli.nic.in 2024