Home Breaking News वाघिणीचा गोऱ्यावर (वासरू) जीवघेणा हल्ला; परिसरात तीव्र दहशत, नागरिकांमध्ये संतापाची लाट!

वाघिणीचा गोऱ्यावर (वासरू) जीवघेणा हल्ला; परिसरात तीव्र दहशत, नागरिकांमध्ये संतापाची लाट!

  • वनविभागाच्या दुर्लक्षामुळे वन्यप्राण्यांची मानवी वस्त्यांवर वाढती मजल
  • चार ते पाच वर्षांच्या मुक्या जनावराची मृत्यूशी झुंज सुरू

नागरी :- नागरी परिसरातील गौळ (बू) शिवारात वाघिणीने एका गोऱ्यावर (वासरू) अचानक जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या भयानक हल्ल्यात वाघिणीने गोऱ्याचा मागचा भाग पूर्णपणे फस्त केला असून, सध्या तो मुक्या प्राणिमात्र मृत्यूशी झुंज देत आहे. हा जखमी गोरा चपत गोळकार यांचा असून त्याचे वय अवघे चार ते पाच वर्षे आहे.



या थरारक घटनेमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र दहशत पसरली असून वनविभागाच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून योग्य त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वनविभागाकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वतःची काळजी बाळगण्याबाबतची उपाययोजना चालू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमधील भीती कायम असून, वनविभागाने तातडीने ठोस पावले उचलून या वाघिणीचा  बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी नागरिकांमधून होत आहे.