वरोरा :- एकलव्य गणेश मंडळ चिरघर प्लॉट वरोरा चे सक्रीय सदस्य कु. अंकित वासेकर यांच्या स्मरणार्थ आज दिनांक २१/०९/२०२६, रोज सोमवार ला आनंदवन येथील कुष्ठरोगी व वृद्धाश्रम येथे भेट देण्यात आली असून तेथे एकलव्य गणेश मंडळ चिरघर प्लॉट वरोरा चे वतीने फळ वाटप करण्यात आले असून यावेळी मंडळाचे ४० ते ५० कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
यावेळी अंकित वासेकर यांच्या आठवणीना उजाळा म्हणून समाजूपयोगी उपक्रम राबवून आपल्या लाडक्या मित्राला आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.. यावेळी परमेश्वर स्व अंकितच्या आत्म्यास चिरशांत लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे असीम दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली… उपक्रमावेळी दवाखान्याचे इन्चार्ज श्री पांडुरंग जी कोमरेड्डीवार व एकलव्य गणेश मंडळ चिरघर प्लॉट वरोरा चे सर्व सदस्य सर्वश्री कुणाल रुयारकर (नगरसेवक), जगदीश वासेकर , राहुल दागमवार, संजू राम, केवल स्वामी, पवन राम, अमोल पारोध्ये, विशाल कोरडे, शुभम मेश्राम, गौरव कुलकर्णी,शुभम फुलझले, विशाल गांजरे (मामा), रुपेश भेदुरकर, महेश बोधाणे, अविनाश आत्राम, गुड्डू तामगाडगे, सनी राम, रवी महागमकर, प्रवीण बोंडे,पंकज वानखेडे, मनोज माळवे , यश निनावेकर, कुणाल गौरकर, प्रज्वल गौरकार , गणेश बोधने, प्रीतम गौरकार अमोल हस्ते, वैभव तिराणकर, मयुर गोटे, पराग ढगे, विशाल वांढरे, भास्कर पानघाटे, अरविंद हिरादेवे, सदानंद तामगाडगे, गावंडे (भासा), नयन भोले, अशोक गवळी, अनंता गिनगुले, किशोर उत्तरवार, रोशन उगले, रितेश नोकरकार, गावंडे (भासा), राजू पराते, नयन भोले आणि इतर बहुसंख्येनी कार्यकर्ते वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.




