Home जिल्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वरोरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वरोरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

वरोरा :-येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने साहित्याचे सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र तांबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमात आदरणीय सुधाकर चौखे यांनी आपल्या मौलिक विचारांतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आणि साहित्याचा विस्तृत मागोवा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
“अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे शोषितांच्या संघर्षाचा आरसा असून, त्यांचे विचार आजही समाजाला नवी दिशा देणारे आहेत.” सुधाकर चौखे सर



🙏 मान्यवरांची उपस्थिती 🙏
याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील अनेक मान्यवर व बहुसंख्य कार्यकर्तागण प्रामुख्याने उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने:
आद. आनंदराव जांभुळकर (तालुका सरचिटणीस, भारतीय बौद्ध महासभा)
💥  आद. दशरथ शेंडे
💥  आद. प्रितम सोनारकर
💥  आद. सरला ठमके
💥  आद. रामटेके काकू
💥  खंडाळे मॅडम
💥  आद. अशोक देवगडे
💥  आद. आनंदराव वानखेडे
💥  आद. बावणे साहेब
💥 डॉ. दुर्गे साहेब
💥  किशोर नगराळे
यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे अत्यंत आकर्षक व नेटके सूत्रसंचालन आद. मधुकरराव बंड सर यांनी केले. या कार्यक्रमामुळे वरोरा शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुन्हा एकदा प्रकर्षाने अनुभवास मिळाला.