Home जिल्हा बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे भवनाच्या स्वच्छता, दुरुस्ती व नियमित वापरासाठी बहुजन समाज पार्टीचे...

बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे भवनाच्या स्वच्छता, दुरुस्ती व नियमित वापरासाठी बहुजन समाज पार्टीचे आयुक्तांना निवेदन

चंद्रपूर : बहुजन समाज पार्टी, चंद्रपूर वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्धपुतळ्याच्या मागे असलेल्या बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे भवनाची तात्काळ स्वच्छता, रंगरंगोटी, दुरुस्ती व नियमित देखभाल करण्यात यावी, तसेच हे भवन सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि नागरिकांच्या वैयक्तिक कार्यक्रमांसाठी नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीचे निवेदन मा. आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका यांना सादर करण्यात आले.
सध्या भवन अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत असून त्याची स्वच्छता व देखभाल न झाल्यामुळे ते वापरासाठी अयोग्य बनले आहे. त्यामुळे जनहित लक्षात घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी बहुजन समाज पार्टीच्या प्रभाग क्र. १३ च्या नगरसेविका सौ. सोनियाताई प्रशांत उंदीरवाडे तसेच बहुजन समाज पार्टी, चंद्रपूर टीम उपस्थित होती.