वरोरा :- वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले लोकप्रिय आमदार मा. श्री. करणदादा संजयजी देवतळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
“तुमचे रक्तदान – कोणाचे तरी जीवनदान” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून, समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवत या शिबिराचे आयोजन ‘करणदादा देवतळे मित्र परिवारा’ द्वारे करण्यात आले आहे. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या आणि जनसामान्यांच्या अडीअडचणी धावून जाणाऱ्या आमदारांच्या वाढदिवसानिमित्त रक्ताचे दान करून त्यांना अभिष्टचिंतन देण्याची सुवर्णसंधी कार्यकर्त्यांना व नागरिकांना मिळणार आहे.
💠 कार्यक्रमाची सविस्तर माहिती 💠
आयोजक :-करणदादा देवतळे मित्र परिवार
स्थळ :- आमदार मा. श्री. करण संजय देवतळे यांचे नवीन जनसंपर्क कार्यालय, एलआयसी (LIC) ऑफिस मागे, वरोरा
दिनांक :-०८/०७/२०२६
या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन, आपले अमूल्य रक्तदान करून गरजूंना जीवदान द्यावे आणि या ऐतिहासिक उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन करणदादा देवतळे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राहुल बांदुरकर, अनिकेत नाकाडे, राजेंद्र सवाई आणि ईश्वर नरड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




