Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यात चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ: शाळांच्या ‘जनावरांसारख्या’ वाहतुकीवर प्रशासन गप्प का?

चंद्रपूर जिल्ह्यात चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ: शाळांच्या ‘जनावरांसारख्या’ वाहतुकीवर प्रशासन गप्प का?

चंद्रपूर :- एकीकडे शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची स्वप्ने दाखवत असताना, दुसरीकडे चंद्रपूर  जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी अत्यंत क्रूरपणे खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात स्कूल बस आणि स्कूल व्हॅन्सद्वारे विद्यार्थ्यांची अक्षरशः जनावरांसारखी वाहतूक केली जात असून, संबंधित यंत्रणा मात्र हातावर हात ठेवून गप्प बसली आहे.




💠 नियमांची पायमल्ली, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात 💠
शालेय वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी कोंबून शाळांत नेले जात आहेत. चंद्रपूर शहर, भद्रावती, वरोरा  यांसारख्या प्रमुख भागांत रोज सकाळी आणि दुपारी शाळा सुटल्यानंतर हे जीवघेणे चित्र पाहायला मिळते. अत्यंत अपुऱ्या जागेत विद्यार्थ्यांना कोंबल्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, हा प्रकार थेट अपघाताला निमंत्रण देणारा आहे.




अर्थपूर्ण’ डोळा? 💠 पालकांच्या तीव्र संतापानंतर अधूनमधून दिखाऊ कारवाईचा फार्स केला जातो, पण काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते. प्रश्न असा निर्माण होतो की, जोपर्यंत एखादी मोठी दुर्घटना घडत नाही, तोपर्यंत प्रशासन कारवाई करणार नाही का? आरटीओ, वाहतूक पोलीस आणि शिक्षण विभाग यांच्या संगनमताशिवाय हा गोरखधंदा सुरू राहणे अशक्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.




💠 पालकांची आक्रमक मागणी 💠
केवळ कागदावरचे नियम नकोत, आता थेट कृती हवी, अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून:
👉  आरोग्य विभाग, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे संयुक्त पथक तयार करावे.
👉  क्षमता ओलांडणाऱ्या प्रत्येक स्कूल बस आणि व्हॅनवर कडक दंडात्मक कारवाई करावी.
👉  विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या संबंधित शाळा व्यवस्थापन आणि वाहनचालकांवर गुन्हे दाखल करावेत.
विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे धोक्यात असताना, जिल्हा प्रशासन या ‘जीवघेण्या वाहतुकीला’ मोकळी वाट मिळवून देणार का, हे आता लवकरच स्पष्ट होईल.