चंद्रपूर :- भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालयातील प्राध्यापक कक्षात इंग्रजी विषयाचे प्रा. डॉ. मोहीत सावे यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण व स्नेहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामुळे महाविद्यालयीन परिसरात आपुलकी, सहकार्य आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. गजानन खामनकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की, वाढदिवसासारख्या छोट्या पण महत्त्वपूर्ण क्षणांचे सामूहिक साजरीकरण केल्याने सहकाऱ्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि आत्मीयता वृद्धिंगत होते. अशा उपक्रमांमुळे संस्थेमध्ये सुसंवाद, एकात्मता आणि सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण होण्यास मोठी मदत होते, असेही त्यांनी नमूद केले. या प्रसंगी ग्रंथपाल डॉ. सुधीर आस्टुनकर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुहास तेलंग, प्रा. अमोल ठाकरे, प्रा. खोजराज कापगते, प्रा. श्रीकांत दाते, प्रा. राजू बैरम, प्रा. संघपाल वेले, प्रा. प्रफुल्ल ढोणे, प्रा. श्रीनिवास शिंदे, डॉ. पल्लवी जिवतोडे, प्रा. पल्लवी वैद्य, प्रा. आशीष चौखे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सावे यांनी सर्वांचे आभार मानत, सहकाऱ्यांच्या शुभेच्छा व प्रेमामुळे कार्य करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळत असल्याचे मनोगत व्यक्त केले.
🙏 जय विदर्भ🙏




