राजुरा : – लीलाधर काळे ( गडचांदूर )
राजुरा शहरातील शिवाजी महाविद्यालय प्रांगणात काल, 12 एप्रिल 2026 रोजी ‘रोटरी क्लब राजुरा’ च्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
👉 प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराजजी अहीर उपस्थित होते. त्यांच्यासोबतच जिल्ह्याच्या राजकारणातील प्रमुख चेहरे आणि लोकप्रतिनिधींनी व्यासपीठ भूषवले, ज्यात प्रामुख्याने:
मा. संजय धोटे (माजी आमदार)
मा. सुदर्शन निमकर (माजी आमदार)
मा. अरुण मसकी (भाजप नेते)
मा. अविनाशभाऊ जाधव (अध्यक्ष, शिवाजी शिक्षण संस्था)
मा. रामू चोरे मा. नथुजी गेडाम (भाजप नेते)
मा. राजू डोरे (माजी नगरसेवक)
मा. जनार्दन निकोडे,आणि मा. राजूभाऊ गोरशेट्टीवार
यांसारख्या मान्यवरांचा समावेश होता.
शिवाजी महाविद्यालयाचे प्रांगण दुमदुमले
रोटरी क्लबच्या या उपक्रमासाठी शिवाजी महाविद्यालयाचे विस्तीर्ण प्रांगण निवडण्यात आले होते. सकाळी 9 वाजेपासूनच नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कार्यक्रमादरम्यान विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली असून, रोटरी क्लबच्या कार्याचे मान्यवरांनी कौतुक केले.
स्थानिक विकास आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्याने राजुरा शहरात एक वेगळेच उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
🙏 जय विदर्भ 🙏




