Home जिल्हा वरोऱ्यात ‘विशाल हिंदू संमेलना’द्वारे हिंदुत्वाचा जयघोष; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

वरोऱ्यात ‘विशाल हिंदू संमेलना’द्वारे हिंदुत्वाचा जयघोष; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

वरोरा : –  ✍️ अभिषेक किशोरराव भागडे
वरोरा :-  राजेंद्र प्रसाद वस्ती येथील हनुमान मंदिर (देवांगन), चीरघर प्लॉट, नेताजी वार्ड येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘विशाल हिंदू संमेलनाचे’ अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदू जनजागृती आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला.
संतांचे आशिर्वचन आणि प्रेरक मार्गदर्शन
कार्यक्रमाचे मुख्य संयोजक हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री गजाननराव पुरकर हे होते. संमेलनाला प्रामुख्याने ह.भ.प. श्री रामानंदजी जीवतोडे (ज्योतिषाचार्य) यांचे संताशिर्वचन लाभले. तसेच विदर्भ प्रांत सरसंघचालक (नागपूर) श्रीधरराव गाडगे यांनी प्रेरक उद्बोधक म्हणून मार्गदर्शन केले.
आपल्या मार्गदर्शनात मान्यवरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना आणि त्यामागचा उद्देश स्पष्ट केला. “जगात हिंदुस्थान हा एकमेव देश आहे ज्याला आपण ‘माता’ (भारत माता) मानतो, हे आपल्या संस्कृतीचे वेगळेपण आहे,” असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
भव्य मिरवणूक आणि कलश यात्रा
कार्यक्रमाची सुरुवात महिला समूहाने केलेल्या महाआरतीने झाली. त्यानंतर शहरातून भव्य कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध महापुरुषांच्या जिवंत झाक्या होत्या. यामध्ये:
⭕ भारत माता
⭕ शिखांचे नववे गुरु – गुरु तेग बहादूर सिंग
⭕ क्रांतीसूर्य बिरसा मुंडा
⭕ छत्रपती शिवाजी महाराज
⭕ पवनसुत हनुमान
या झाक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भजन मंडळांचा आयोजकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
हिंदू रक्षक व समाजसेवकांचा गौरव
हिंदुत्व रक्षणासाठी आणि दैनंदिन कार्यातून हिंदू जागृती करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने:
👉 ज्येष्ठ सदस्य व माजी अध्यक्ष श्री ऋषी पंधरे, कारसेवक श्री दिलीप घोरपडे.
👉 हनुमान सेवा मंडळाचे सचिव मनोहर स्वामी, उपाध्यक्ष सुरेश स्वामी, कोषाध्यक्ष डॉ. प्रकाश कोटेच्या.
👉 मंदिरात नित्य आरती करणारा महिला समूह, विनोद हुसुकुले, दत्ता तडस, यश निनावेकर आणि मनोहर वरभे.
🛑  मान्यवरांची उपस्थिती 🛑
या सोहळ्याला माजी नगरसेवक तथा भाजपचे ज्येष्ठ नेते श्री बाबासाहेब भागडे, रा.स्व. संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी मनोज रेलकर, श्री भट, श्री वांदिले, श्री. शैलेश भ्रूगुरवार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिश्रम आणि सांगता
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.स्व. संघाचे पदाधिकारी अंकित तेलासे, संजय राम, यश निनावेकर, स्वप्निल टिपले, अमोल पारोधे, विशाल कोरडे, रोशन उगले, लोकेश रुयारकर, अनुकल, महेश श्रीरंग, जयंत पुर्जेकर, गणेश नक्षीने, युवराज शेंडे, वृषभ बर्डे, विजय बेलेकर व अन्य स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे नेटके संचालन राहुल दागमवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संयोजक गजाननराव पुरकर यांनी मानले. सोहळ्याच्या शेवटी सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

🙏 जय विदर्भ🙏