भद्रावतीत ‘न्यू एरा क्लीनटेक’च्या कोळसा गॅसिफिकेशन व कार्बन कॅप्चर प्रकल्पाचे भूमिपूजन चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे ‘न्यू एरा क्लीनटेक’ या कंपनीच्या महत्त्वाकांक्षी इंटिग्रेटेड कोल गॅसिफिकेशन (कोल-टू-केमिकल्स) आणि कार्बन कॅप्चर प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात येनार आहे.या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच भारत सरकारचे कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी हे मान्यवर पाहुणे म्हणून सहभागी होनार व.भूमिपूजन करना आहे. तरी या कार्यक्रमात समस्त जनतेनी यावे.शनिवार | १४ मार्च २०२६ सकाळी १०:३० वाजल्यापासून प्लॉट नं. B3, मेजर MIDC सुमताना रोड, भद्रावती. जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरात औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा असून रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोळशाचे रसायनांमध्ये रूपांतर आणि कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणपूरक औद्योगिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
🙏जय विदर्भ🙏




