Home क्राईम स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल, वरोरा – क्राईम स्पेशल वरोऱ्यात भरदिवसा रक्तरंजित...

स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल, वरोरा – क्राईम स्पेशल वरोऱ्यात भरदिवसा रक्तरंजित थरार : बिअरच्या बाटल्या फोडून, कटर-लाठ्यांनी दोन युवकांवर जीवघेणा हल्ला

 

वरोरा : शहरातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना वरोऱ्यात घडली आहे. नगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या मागील कॅरम बोर्ड सेंटर परिसरात भरदिवसा दोन युवकांवर अत्यंत क्रूर पद्धतीने हल्ला करण्यात आला. बिअरच्या बाटल्या फोडून, धारदार कटर आणि लाठ्यांनी करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास काही युवकांमध्ये जुन्या वादावरून जोरदार वादावादी झाली. काही क्षणातच हा वाद हिंसक स्वरूपात बदलला. संतापलेल्या आरोपींनी हातातील बिअरच्या बाटल्या फोडून त्याच बाटल्यांनी वार केले तसेच कटर आणि लाठ्यांनी दोन्ही युवकांवर बेछूट हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या भीषण मारहाणीत महेश खामणकर (वय २६) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याचा मित्र ओम अरविंद गेयनवार (वय २२) हाही गंभीर जखमी झाला आहे. महेश खामणकर याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प परिसरातील कोलसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणात आरोपींनची शोध मोहीम चालु असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे वरोरा शहरात गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा सुरू झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

🙏जय विदर्भ.🙏