⭕🙏 वरोऱ्यात किन्नर कलश शोभा यात्रेचा जल्लोष! जनतेच्या स्वागताने परिसर दुमदुमला 🙏⭕

🔥 वरोऱ्यात किन्नर कलश शोभायात्रेचा जल्लोष! जनतेच्या स्वागताने परिसर दुमदुमला 🔥

वरोरा : ✍️ अभिषेक भागडे

अखिल भारतीय किन्नर महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या भव्य किन्नर कलश शोभायात्रेचे वरोरा शहरात अभूतपूर्व आणि जंगी स्वागत करण्यात आले. नगरसेविका सौ. लिना संजय गयनेवार यांच्या पुढाकारातून तसेच वार्डमधील सजग व जागरूक नागरिकांच्या सहकार्याने शोभायात्रेचे फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी शोभायात्रेत सहभागी किन्नर समाजाच्या प्रतिनिधींचा सन्मान करत अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. सामाजिक सलोखा, समतेचा संदेश आणि मानवी मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या स्वागत समारंभाला नगरसेवक गणेश भिवदरे तसेच नगरसेविका सौ. सीमा सचिन तडस यांची विशेष उपस्थिती लाभली. लोकप्रतिनिधींनी किन्नर समाजाच्या सन्मानार्थ राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत सामाजिक ऐक्य अधिक बळकट होण्याचा संदेश दिला.

🌸 शहरात सामाजिक समतेचा जागर, वरोरा पुन्हा एकदा आदर्श ठरला! 🌸
किन्नर समाजाच्या सन्मानासाठी पुढे आलेल्या नगरसेविका सौ. लिना गयनेवार व वार्डवासीयांच्या या उपक्रमामुळे वरोऱ्याची सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

👉 स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल
सत्य, सामाजिक जाणीव आणि ठाम भूमिकेचा आवाज…
🙏🏼 जय विदर्भ🙏🏼
बातमी व जाहिरात साठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️ 8329889732