⭕🙏 वडगावात राजकीय रणशिंग फुंकले🙏⭕

**वडगावात राजकीय रणशिंग फुंकले!

सुनीता वीरेंद्र लोडिया (माडेकर) यांच्या प्रचाराचा हनुमान मंदिरातून दणदणीत शुभारंभ**

✍️ वडगाव | अभिषेक भागडे

वडगाव प्रभाग क्र. ८ (अ) मध्ये आजपासून निवडणूक रणधुमाळीला अक्षरशः आग लागली असून, सुनीता वीरेंद्र लोडिया (माडेकर) यांच्या प्रचाराचा ठणठणीत आणि शक्तीप्रदर्शनात्मक शुभारंभ हनुमान मंदिर, जुनी वस्ती येथून करण्यात आला.
सकाळी ९ वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमाने संपूर्ण प्रभागात राजकीय खळबळ उडवून दिली आहे.

“नम्र विनंती” असली तरी संदेश मात्र थेट, स्पष्ट आणि आक्रमक –
वडगावच्या विकासासाठी आता समजूतदार नव्हे, लढवय्या नेतृत्व हवे, आणि ते नेतृत्व सुनीता लोडिया यांच्या रूपाने उभे राहत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

हनुमान मंदिरात विधिवत पूजा करून प्रचाराची सुरुवात करताच
👉 कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह
👉 समर्थकांची गर्दी
👉 विरोधकांच्या गोटात अस्वस्थता
असे वातावरण निर्माण झाले.

स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून
“यावेळी बदल ठरलेलाच!”
असा ठाम सूर व्यक्त केला.

🔥 स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टलचा थेट सवाल

वडगावचा विकास रखडलेला असताना,
जनतेचे प्रश्न प्रलंबित असताना,
आता फक्त आश्वासनं देणाऱ्यांना जागा आहे का?
की मैदानात उतरून लढणाऱ्या नेतृत्वालाच संधी मिळणार?

सुनीता लोडिया (माडेकर) यांच्या प्रचाराच्या या आक्रमक सुरुवातीने
निवडणूक लढत आता सौम्य राहिलेली नाही,
हे मात्र नक्की!

📢 ठणठणीत बातम्या, निर्भीड भूमिका —
फक्त स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टलवर!

🙏जय विदर्भ🙏

बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा.

☎️9673574711

☎️8329889732