वरोरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025
भाजपा च्या 11 उमेदवारां चा दणदणीत विजय; सर्व विजयी उमेदवारांचे जल्लोषात अभिनंदन
वरोरा : ✍️ अभिषेक भागडे
वरोरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत आणि ऐतिहासिक यश संपादन करत शहराच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विविध प्रभागांतून भाजपाच्या उमेदवारांनी जनतेचा विश्वास संपादन करत निर्णायक विजय मिळवला असून, या विजयामुळे वरोरा शहरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
या निवडणुकीत भाजपाच्या विजयी उमेदवारांनी विकास, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. “सबका साथ, सबका विकास” या ध्येयधोरणावर विश्वास ठेवत नागरिकांनी भाजपाला कौल दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –
प्रभाग क्रमांक १ : सौ. नलिनी देविदास आत्राम
प्रभाग क्रमांक २ : सौ. वर्षा मंगेश पिसाळ
प्रभाग क्रमांक ३ :
सौ. लिना संजय गयनेवार
श्री. संतोष सुरेश पवार
प्रभाग क्रमांक ६ :
श्री. अक्षय दिलीप भीवदरे
सौ. आशा किशोर आसेकर
प्रभाग क्रमांक ८ : सौ. मनीषा संजय दानव
प्रभाग क्रमांक १० : सौ. सिमा सचिन तडस
प्रभाग क्रमांक १२ : सौ. लता रमेश हिवरकर
प्रभाग क्रमांक १३ :
श्री. प्रवीण चंपतराव चिंमुरकर
सौ. सुप्रिया भरत तेला
या सर्व विजयी उमेदवारांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, नागरिकांनी त्यांच्याकडून विकासाभिमुख व लोकहिताच्या कामांची अपेक्षा व्यक्त केली आहे.
नेतृत्वाचे मार्गदर्शन व अभिनंदन
या यशाबद्दल आमदार मा. श्री. करण संजय देवतळे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की,
“वरोरा नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजपाचे सर्व नगरसेवक संघभावनेने काम करतील. नागरिकांनी दिलेला विश्वास विकासकामांतून सार्थ ठरवू.”
तसेच वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही या विजयाचे श्रेय पक्षाच्या संघटनशक्तीला, कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आणि जनतेच्या पाठिंब्याला दिले आहे.
विकासाला नवी दिशा
या निकालामुळे वरोरा शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व मूलभूत सुविधा अधिक सक्षम होतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. भाजपाच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद अधिक गतिमान व लोकाभिमुख कारभार करेल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमध्ये आहे.
—🙏 जय विदर्भ🙏— {:बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️9673574711 ☎️ 7329889733 }




