Home राजकारण ⭕🙏 भारतीय जनता पार्टीच्या चा प्रचाराला सुरुवात🙏⭕

⭕🙏 भारतीय जनता पार्टीच्या चा प्रचाराला सुरुवात🙏⭕

filter: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; captureOrientation: 90; hdrForward: 6; shaking: 0.000000; highlight: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask: 8; brp_del_th: 0.0020,0.0000; brp_del_sen: 0.1500,0.0000; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 39;

वरोरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५
प्रभाग क्र. ७ (ब) : भाजप उमेदवार सचिन चुटे यांच्या प्रचार कार्यालयाचा दिमाखदार शुभारंभ

वरोरा : ✍️ अभिषेक भागडे

वरोरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करण दादा देवतळे तसेच रमेश जी राजुरकर यांच्या मार्गदर्शनात आज प्रभाग क्र. ७ (ब) गटातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. सचिन चुटे यांच्या प्रचार कार्यालयाचा आज उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. बहुसंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत प्रचाराला औपचारिक सुरुवात झाली.

या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी, महिला आघाडी, युवा मोर्चा तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर परिसरात जनसंपर्क अभियान राबवण्यात आले. नागरिकांशी थेट संवाद साधत श्री. सचिन चुटे यांनी आपल्या विकासात्मक संकल्पना मांडल्या.

यावेळी बोलताना श्री. चुटे म्हणाले की, “प्रभागातील मूलभूत सुविधा मजबूत करणे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर तातडीने उपाय करणे हेच माझे प्राधान्य राहील. प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि पारदर्शक कारभारासाठी मी कटिबद्ध आहे.”

कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन प्रचार करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला. प्रचार कार्यालय हे आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी खुले राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

उत्साह, शिस्तबद्ध नियोजन आणि कार्यकर्त्यांचा जोम पाहता प्रभाग क्र. ७ (ब) मध्ये भाजपचा प्रचार वेग घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आगामी निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा कौल मिळवण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. —🙏जय विदर्भ🙏—{ बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️ 9673574711 ☎️ 8329889732}