माजरी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळवाटप कार्यक्रम संपन्न
माननीय हंसराज भैय्या अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन
माजरी ✍️अभिषेक भागङे (ता. वरोरा, जि. चंद्रपूर) – राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा भारत सरकारचे माननीय हंसराज भैय्या अहिर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज माजरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे फळवाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. अमृता ताई सूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. रुग्णांना फळवाटप करून त्यांच्या लवकर स्वास्थ्यलाभाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र धोटे, सुशील घायवन, बाळूभाऊ आवारी (उपसरपंच, पाटाळा), सकाराम ताजणे, प्रशांत अस्वले, सुशांत लांडगे, जीवनभाऊ रोडे, अनिता रोडे, सुरज काळे, आशिष मेश्राम, राहुल दुरुटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले असून सर्व मान्यवरांनी हंसराज भैय्या अहिर यांच्या दीर्घायुष्य व यशस्वी आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम स्थानिक नागरिकांकडून कौतुकास्पद ठरला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. समाजहिताच्या कार्यातून माननीय अहिर यांच्या प्रेरणेने सतत जनसेवा करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.—🙏 जय विदर्भ🙏—( जाहिराती आणि बातम्या करता संपर्क साधा ☎️-9673574711 ☎️8329889732)




