📰 हॉस्पिटलमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक : शासनाचा स्पष्ट नियम

✍️ अभिषेक भागडे, वरोरा

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या असाधारण राजपत्र (भाग-४ ब) नुसार, राज्यातील सर्व हॉस्पिटल व आरोग्य संस्थांना उपचार आणि सेवांचे दरपत्रक तयार करून ते रुग्णांना दिसेल अशा ठिकाणी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाच्या निर्देशांनुसार प्रत्येक हॉस्पिटलने रुग्णालयातील सर्व सेवांचे दर स्पष्टपणे नमूद करणारे दरपत्रक तयार करावे. हे दरपत्रक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असणे आवश्यक आहे.

दरपत्रकात खालील बाबींचा समावेश असावा —

रूम भाडे

डॉक्टरांची फी

तपासण्या (टेस्ट्स)

ऑपरेशनचा खर्च

औषधे व इतर सेवा शुल्क

शासनाच्या नियमांनुसार, हॉस्पिटलने दरांमध्ये कोणतेही बदल केल्यास नवीन दरपत्रक संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे.

दरपत्रक लावण्यात दुर्लक्ष करणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या संस्थांवर शासनाकडून दंडात्मक कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या नियमाचा प्रमुख उद्देश म्हणजे —
रुग्णांना उपचारापूर्वी संपूर्ण खर्चाची स्पष्ट माहिती मिळावी, फसवणूक टाळावी आणि पारदर्शक आरोग्यसेवा प्रणाली निर्माण करावी, हा आहे.

सदर आदेश सर्व सरकारी, अर्धसरकारी तसेच खासगी रुग्णालयांना लागू असून, आरोग्य विभागाने याची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.

(राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या असाधारण राजपत्र, भाग-४ ब मधील नियमांवर आधारित)
( जाहिराती आणि बातम्या करिता संपर्क साधा) ☎️=9673574711

—🙏 जय विदर्भ🙏—