Home जिल्हा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर महागले

व्यावसायिक एलपीजी सिलेंडर महागले

व्यावसायिक एलपीजी सिलेंडर महागले
commercial-lpg-cylinder-mahagale

मुंबई (Mumbai) 01 ऑक्टोबर :-  भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 48.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर 5 किलो फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरही 12 रुपयांनी महागला आहे. या वाढीव किमती आज, मंगळवारी 1ऑक्टोबरपासून लागू झाल्या आहेत. दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सप्टेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात सुमारे 39 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तिसऱ्यांदा वाढ केली आहे. गेल्या 3 महिन्यांत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत एकूण 94 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरवाढीनंतर कमर्शिअल एलपीजी सिलेंडरची किंमत दिल्लीत 1740 रुपये झाली आहे. यापूर्वी सिलेंडरचे दर 1691. 50 रुपये होती. कोलकाता येथे एलपीजी 1850.50 तर मुंबईत 1692.50 रुपये झाली आहे.

Mumbai City
Mumbai map
Mumbai Pin Code
Mumbai Indians
Mumbai populationMumbai
district Name
Mumbai city name
Mumbai weather