Home महाराष्ट्र विद्यार्थ्यांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

विद्यार्थ्यांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

विद्यार्थ्यांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
Officials of various organizations along with students struck at the Amravati Collectorate

अमरावती:- पश्चिम बंगालमध्ये कोलकाता (Kolkata) येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारा विरोधात संपूर्ण देशभर संताप व्यक्त केल्या जात आहे. आज अमरावती येथेही या घटनेचा निषेध करण्यात आला. डॉ. राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA), रोटरी क्लब(Rotary Club), फार्मासिस्ट असोसिएशन, रक्तदान समिती यासह वैद्यकीय क्षेत्राशी निगडित अनेक संघटनांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हातात विविध घोषणांचे फलक घेत डॉक्टर सह वैद्यकीय क्षेत्राशी निगडित कर्मचाऱ्यांच्या संवरक्षणासाठी कायदा करण्याची व कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

कोलकात्यात आरजी कर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने(IMA) 17 ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच आयएमएने रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. तसेच आजपासून देशभरातील डॉक्टरांकडून आंदोलन तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहे.