बच्चू कडूंना बॅट तर, आंबेडकरांना मिळाले गॅस सिलेंडर निवडणूक चिन्ह

बच्चू कडूंना बॅट तर, आंबेडकरांना मिळाले गॅस सिलेंडर निवडणूक चिन्ह
While Bachu Kadu got bat, Ambedkar got gas cylinder election symbol

अमरावती:- आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी आपापल्या मतदारसंघात सभा, दौरे सुरू आहेत अशातच आता प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ति पक्षाला निवडणूक आयोगाने बॅट हे चिन्ह दिलेले आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत बच्चू कडू बॅट या नव्या चिन्हाने निवडणुकीच्या रिंगणात उतरून नक्कीच चौकार, षटकार मारणार यात काहीही शंका नाही.

तर, बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाने चिन्ह दिलं आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडी हे गॅस सिलेंडर या नव्या चिन्हाने मैदानात उतरणार आहेत. निवडणूक आयोगा (Election Commission) ने विधानसभा निवडणुकीसाठी वंचितला गॅस सिलेंडर दिले आहे.