Home क्राईम भोलेबाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी, 26 महिलांचा मृत्यू,

भोलेबाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी, 26 महिलांचा मृत्यू,

 काही पायाखाली चिरडले तर काही गुदमरले; भक्तांवर दुःखाचा डोंगर

भोलेबाबाच्या भक्तांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सत्संगात भाविक तल्लीन झाले होते. तेव्हाच अचानक चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. कोणी पायाखाली चिरडल्या गेले. तर काही जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, 26 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर अनेक गंभीर आहेत. या घटनेने आयोजकांसह भाविकभक्तांच्या नातेवाईकांना पण धक्का बसला आहे. यावेळी सरकारी रुग्णालय आणि खासगी रुग्णालयाबाहेर नातेवाईकांच्या आक्रोशाने सर्वांचीच मनं हेलावली.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील फुलरई या गावात हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गावात भोलेबाबाच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारोंच्या संख्येने भाविक पोहचले होते. या कार्यक्रम दरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली. यात काही जण पायाखाली आले तर काही जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. हाती आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत मयतांचा आकडा 27-28 वर पोहचला आहे. सार्वजनिक आरोग्य केंद्रात अनेकांना भरती करण्यात आले आहे. तर या दुर्घटनेतील गंभीर भाविकांना जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मयताचा आकडा वाढण्याची भीती सरकारी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.