वरोरा :- वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी अमली पदार्थांवविरोधात मोठी कारवाई करत एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल १४,५०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
💥 कारवाईची पार्श्वभूमी 💥
दिनांक २१/०८/२०२६ रोजी वरोरा पोलीस स्टेशनचे पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना, वरोरा शहरातील कॉल्लरी वार्ड येथे गांजा या अमली पदार्थाची विक्री होत असल्याची व तो कुठेतरी लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मुखबिर मार्फत मिळाली.
💥 पोलिसांची कारवाई 💥
माहिती मिळ Fi वरून पोलीस अधीक्षक श्री. आयुध नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी अधिकारी श्री. ओमप्रकाश सोनटक्के यांनी तात्काळ एक पथक तयार केले.
पथक प्रमुख पोउपनि मनिष तालेवार व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे विशेष मोहीम राबवून आरोपी सुरज उर्फ भु-या तेजुराम शाहू (वय २३ वर्ष, रा. नवीन वस्ती, कॉल्लरी वार्ड, वरोरा) याला ताब्यात घेतले. आरोपीच्या राहत्या घरची झडती घेतली असता, त्या ठिकाणी काळापट-हिरवट झाडपत्ती दिसणारा व उग्र वास येणारा ओल्सर गांजा वनस्पतीचे पाने, फुले व बिया सह एकूण २८८.८६ ग्रॅम वजनाचा माल (किंमत १४,५००/- रुपये) जप्त करण्यात आला.गुन्हा दाखल आरोपीविरोधात पो. स्टे. वरोरा येथे अप.क्र.९१२/२०२६ कलम ८(सी), २०(बी) एनडीपीएस ॲक्ट (NDPS Act) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोउपनि मनिष तालेवार, पो.स्टॉप संदीप मुळे, महेश गावतुरे, विशाल राजूरकर आणि मनोज ठाकरे यांच्या विशेष पथकाने पार पाडली.




