Home जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यात आगामी सण-उत्सव शांततेत व पर्यावरणपूरक वातावरणात साजरे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन.

चंद्रपूर जिल्ह्यात आगामी सण-उत्सव शांततेत व पर्यावरणपूरक वातावरणात साजरे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन.

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात आगामी सण-उत्सव शांततेत व पर्यावरणपूरक वातावरणात साजरे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन.चंद्रपूर जिल्ह्यात आगामी गणेशोत्सव, ईद, जन्माष्टमी, रक्षाबंधन आणि पोळा हे सण-उत्सव नेहमीप्रमाणे परस्पर सलोखा, शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्याबाबत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय (नियोजन भवन) येथे आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी प्रशासकीय भूमिकेवर भर दिला.



💥 बैठकीतील प्रमुख मुद्दे व प्रशासकीय निर्देश💥
एक खिडकी योजना :-गणेश मंडळांना परवानग्या वेळेत मिळाव्यात म्हणून महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात ‘एक खिडकी योजना’ राबवली जाणार आहे.
पर्यावरणपूरक उत्सव :- निर्माल्य संकलन, स्वच्छता आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणावर विशेष भर दिला जाणार असून, नागरिकांसाठी कृत्रिम विसर्जन टँकची पूर्वकल्पना दिली जाईल.
सुरक्षा व सीसीटीव्ही :- गर्दीच्या ठिकाणी असामाजिक तत्त्वांवर वचक ठेवण्यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
लेझर लाईट बंदी व सायबर नजर :- उत्सवादरम्यान लेझर लाईटच्या वापरावर पूर्ण बंदी असून, सोशल मीडियावरील अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर टीम २४ तास कार्यरत राहणार आहे.
सायलेंट झोन व नियम :- विनापरवानगी कार्यक्रम टाळणे, वाहतुकीला अडथळा न करणे आणि घोषित सायलेंट झोनमध्ये नियमांचे काटेकोर पालन करण्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
आपत्कालीन संपर्क :- कोणत्याही आपत्कालीन किंवा संशयास्पद परिस्थितीमध्ये नागरिकांनी तत्काळ ☎️ 112 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

संबंधित नागरिक आणि गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करून उत्सव आनंदात आणि सुरक्षितपणे पार पाडावेत, अशी अपेक्षा या बैठकीतून व्यक्त करण्यात आली आहे.