घुगुस :-महाराष्ट्राचे लाडके नेते, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ‘देवा भाऊ सेवा सप्ताह’ अंतर्गत प्रभाग क्रमांक ११ मध्ये एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या समाजोपयोगी व मानवीय उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा व तरुणांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक आशिष माशिडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा मोठा ओघ पाहायला मिळाला. यामध्ये तरुण, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोग्याची काळजी आणि समाजसेवेचे व्रत जपत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शिबिरादरम्यान एकूण ७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले. नागपूर येथील सुप्रसिद्ध अमन ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे रक्तसंकलन अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
🙏मान्यवरांच्या उपस्थितीने शिबिराची शान🙏
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व आदरणीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभाग ११ मधील नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी स्वतः उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढवला तसेच त्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.
🙏रक्तदानाचे महत्त्व आणि उपक्रमाचे कौतुक 🙏
आजच्या काळात अपघाताच्या प्रसंगी किंवा गंभीर आजारांवर उपचारासाठी रक्ताचा तुटवडा भासतो. अशा वेळी रक्ताची गरज भागवण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन ही काळाची गरज बनली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनानिमित्त केवळ राजकीय उत्सव न साजरा करता, अशा प्रकारचा लोकोपयोगी आणि आरोग्यवर्धक उपक्रम राबवल्याबद्दल प्रभाग ११ मधील नगरसेवक आशिष माशिडकर व भाजप पदाधिकाऱ्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अमन ब्लड नागपुर बँकेच्या सहकार्याने आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे पार पडलेला हा उपक्रम संपूर्ण परिसरात एक आदर्श आणि चर्चेचा विषय ठरला आहे.




