Home जिल्हा संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे लोकशाहीचा उत्सव; विद्यार्थी परिषद निवडणूक उत्साहात...

संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे लोकशाहीचा उत्सव; विद्यार्थी परिषद निवडणूक उत्साहात संपन्न

वरोरा :- येथील संस्कार भारती पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची विद्यार्थी परिषद (स्टुडंट कौन्सिल) निवडणूक अत्यंत उत्साहपूर्ण आणि लोकशाही वातावरणात पार पडली. या निवडणुकीच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात लोकशाही मूल्यांची जोपासना दिसून आली.
निवडणूक प्रक्रिया पार पडताना विद्यार्थ्यांनी मतदानाचा आपला अधिकार जबाबदारीने आणि शिस्तीने बजावला. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि लोकशाही मूल्यांविषयीची जागरूकता स्पष्टपणे दिसून येत होती.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. राणी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. उपमुख्याध्यापिका सौ. श्रद्धा चौबे , निवडणूक समितीचे सदस्य आणि सर्व शिक्षकवृंदाच्या चोख नियोजनामुळे मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व सुव्यवस्थित झाली.
शाळा व्यवस्थापनाने या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होते, जे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.”
निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालय परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले असून, निवडून येणाऱ्या नवीन प्रतिनिधींना त्यांच्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.