भद्रावती :- पत्रकार आणि माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींच्या हक्कासाठी आक्रमकपणे लढा देणाऱ्या ‘भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया’ची सर्वसाधारण बैठक येत्या रविवार, दिनांक १९ जुलै रोजी भद्रावती येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संघटनेची पुढील रणनीती निश्चित केली जाणार असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार सोहळा पार पडणार आहे.
या बैठकीला संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान अय्युबभाई कच्छी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या समस्या आणि संघटनेचे बळकटीकरण यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
🙏प्रमुख उपस्थिती 🙏
या बैठकीसाठी राष्ट्रीय युवा अध्यक्ष अरशदभाई कच्छी, राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख शोएबभाई कच्छी, केंद्रीय महानगर अध्यक्ष देवेंद्र हिंगोरानी, राष्ट्रीय महासचिव सफीरुद्दीन ख्वाजा, चंद्रपूर-गडचिरोली निरीक्षक दिनेश मिश्रा, केंद्रीय सदस्य नागेन्द्र चटपल्लीवार, चंद्रपूर महानगर अध्यक्ष जुनैद खान, चिमूर तालुका अध्यक्ष दयाराम टेंभुर्णे, चिमूर शहर अध्यक्ष प्रवीण माटेटवार, वरोरा तालुका अध्यक्ष अभिषेक भागडे, भद्रावती महिला तालुका अध्यक्षा जया मुकेश मेश्राम, भद्रावती महिला शहर अध्यक्षा विभा मदन बेहरे आणि भद्रावती महिला शहर उपाध्यक्षा वंदना उईके यांच्यासह संपूर्ण कोअर कमिटी उपस्थित राहणार आहे.
🙏 नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा 🙏
संघटना अधिक गतिमान करण्यासाठी नुकत्याच नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये सुनील रामटेके (तालुका उपाध्यक्ष), जितेंद्र गुलानी (शहर उपाध्यक्ष), जया मेश्राम (महिला तालुका अध्यक्षा, भद्रावती), विभा बेहरे (महिला शहर अध्यक्षा, भद्रावती) आणि अभिषेक भागडे (वरोरा तालुका अध्यक्ष) यांना अधिकृत नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहेत.
⭕ बैठकीचा तपशील ⭕
👉 दिनांक :- १९ जुलै (रविवार)
👉 वेळ :- दुपारी ३:०० वाजता
👉 स्थळ :- मुस्लिम समाज भवन, शाही चौक, आंबेडकर शाळेजवळ, भद्रावती.
भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाच्या सर्व नवनियुक्त पदाधिकारी आणि सदस्यांनी या महत्त्वपूर्ण बैठकीला निश्चित वेळेवर उपस्थित राहून संघटनेची एकता दाखवून द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




