Home जिल्हा शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ नको! शेतकरी फीडरचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक

शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ नको! शेतकरी फीडरचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक

वरोरा :-वरोरा तालुक्यातील नागरी परिसरातील शेतकरी फीडरचा वीजपुरवठा रात्रीच्या वेळी खंडित करण्याच्या महावितरणच्या मनमानी कारभाराविरुद्ध भारतीय जनता युवा मोर्चाने दंड थोपटले आहेत. या निर्णयामुळे शेतकरी रात्रभर जीव मुठीत धरून शेतात काम करत असून, महावितरणच्या या गलथान कारभाराविरोधात भाजयुमो तालुका अध्यक्ष सुरज धात्रक यांच्या नेतृत्वात आज आक्रमक पवित्रा घेत आमदार मा. श्री. करणदादा संजयजी देवतळे यांना निवेदन सादर करण्यात आले.




रात्रीचा वीजपुरवठा: शेतकऱ्यांसाठी ‘मृत्युघंट’
निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, नागरी परिसरातील शेतकरी फीडरचा वीजपुरवठा रात्रीच्या वेळी बंद ठेवला जात असल्याने शेतकऱ्यांसमोर भीषण समस्या निर्माण झाली आहेत. रात्रीच्या अंधारात पिकांना पाणी देताना सर्पदंश, विंचू व इतर हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. मात्र, महावितरण प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिसरातील शेती फिडरवर पुरीप्रमाणे रात्रभर किमान सिंगल फेज  या परिसरातील घरगुती विद पुरवठा नेहमी सुरू असला तरी शेती फिटर वरील विद पुरवठा सायंकाळी साधारण सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहे या कालावधीत संपूर्ण शेती परिसर अंधारात जात असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक गंभीरणांना सामना करावा लागत आहे लाईट बंद असल्यामुळे शेतीमधील साहित्य चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाची भीती लागलेली आहे व तसेच जनावरांना चारा पाणी टाकण्यासाठी रात्री जावं लागते त्यामुळे इंसूचा विषारी प्राण्याचा धोका वाढेल तसेच रानडुक्कर नीलगाय व इतर वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होत असल्यामुळे पूर्वीप्रमाणे शेती फिटर वरील विथ पुरवठा सायंकाळी सहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत सिंगल फेज सुरू करण्यात यावा.




चोरांचे फावले, शेतकऱ्यांचे नुकसान
रात्रीच्या वेळी वीजपुरवठा नसल्याचा फायदा घेऊन शेतातील महागडे पंप, केबल, मोटार आणि कृषी अवजारे चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. या चोरीच्या घटनांना महावितरणचा रात्रीचा वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णयच जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.




“महावितरणने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये”
शेतकऱ्यांच्या या समस्या गांभीर्याने घेऊन नागरी परिसरातील शेतकरी फीडरवरील वीजपुरवठा पूर्वीप्रमाणे नियमित आणि सुरळीत सुरू करावा, अन्यथा भारतीय जनता पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भाजयुमोने दिला आहे.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष  राजेंद्र सवाई , भाजप तालुका पदाधिकारी योगेश खिरटकर यांच्यासह भारतीय जनता पक्ष आणि भाजयुमोचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेली ही लढाई आता निर्णायक वळणावर पोहोचली असून, महावितरण प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.