Home जिल्हा लग्नाचे आमंत्रण आणि वृक्षारोपणाचा ‘हरित संकल्प’; भागडे परिवाराचा अभिनव उपक्रम चर्चेत!

लग्नाचे आमंत्रण आणि वृक्षारोपणाचा ‘हरित संकल्प’; भागडे परिवाराचा अभिनव उपक्रम चर्चेत!

वरोरा :- आजच्या काळात जिथे विवाहाच्या पत्रिका केवळ औपचारिकता ठरत आहेत, तिथे वरोरा येथील भाजपचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री बाबाभाऊ भागडे यांच्या परिवाराने एक आदर्श पायंडा पाडला आहे. त्यांच्या पुतण्याचे,( प्रफुल जगन्नाथराव भागडे, माजी सैनिक तथा माझी पोलीस यांचा मुलगा ) सौरभ आणि चि. सौ. का. साक्षी यांच्या विवाहानिमित्त त्यांनी दिलेल्या निमंत्रण पत्रिकेसोबत ‘वृक्षारोपणाचा संदेश’ देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.




“द्या आशीर्वाद नवदाम्पत्याला, लावा एक झाड धरती मातेला” – हा मंत्र घेऊन भागडे परिवाराने ‘मंगलमिलन हरित संकल्प’ राबवला आहे. विवाह पत्रिकेसोबत वृक्षप्रेमी संदेश देणारी बियांची पाकिटे देऊन त्यांनी केवळ शुभविवाहाची बातमी दिली नाही, तर पर्यावरणाप्रती आपली जबाबदारीही ओळखून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.




💠 समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम 💠
विवाहासारख्या आनंदाच्या सोहळ्याला सामाजिक जाणीवेची जोड देऊन भागडे परिवाराने हे सिद्ध केले आहे की, उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. हा उपक्रम केवळ त्यांच्या नातेवाईकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अनुकरणीय आहे.
या अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रमाबद्दल भागडे परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नवदाम्पत्य  “सौरभ आणि साक्षी “यांना त्यांच्या नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!