Home महाराष्ट्र निष्ठेचा भव्य सागर उसळला; यवतमाळचा बालेकिल्ला अभेद्य!

निष्ठेचा भव्य सागर उसळला; यवतमाळचा बालेकिल्ला अभेद्य!

यवतमाळ :-“ज्यांना पक्षाने मोठे केले, मानाचे स्थान दिले आणि देशाच्या वरिष्ठ सभागृहात पाठविले, तेच आज सत्तेच्या हव्यासापोटी गद्दार झाले!” अशा तिखट शब्दांत गद्दारांचा समाचार घेत, यवतमाळच्या जनतेने आणि शिवसैनिकांनी आपली वज्रमूठ सिद्ध केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख, मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्यसाहेब ठाकरे, विनायक राऊत,यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भव्य सभेत यवतमाळचा जनसागर उसळला होता. वनी विधानसभाचे लोकप्रिय आमदार संजय दरेकर यांनी आपल्या भाषणातून गद्दारांना चोखउत्तर दिले आहे.




💠 गद्दारांना चोख प्रत्युत्तर 💠
यवतमाळचा हा भगवा किल्ला अभेद्य होता, आहे आणि राहील, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी यवतमाळचा कडवा आणि एकनिष्ठ शिवसैनिक सज्ज झाला असून, या सभेनंतर गद्दारांचा थरकाप उडाला असल्याचे चित्र दिसून आले. सत्तेच्या हव्यासापोटी पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना आता पळता भुई थोडी होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.




💠 नेत्यांची उपस्थिती आणि जनसमुदाय 💠
या भव्य सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख नेते, जिल्ह्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो निष्ठावंत शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती. निष्ठेचा हा महासागर पाहता, यवतमाळचा बालेकिल्ला कोणीही भेदू शकत नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.