वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
वरोरा- भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहरात विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मित्र चौक, महेश सिलेक्शनजवळ भव्य ‘मसाला दूध वितरण’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रेचे स्वागत करत, या सेवाभावी उपक्रमात शेकडो नागरिकांनी आणि भाविकांनी मसाला दुधाचा आस्वाद घेतला. भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून समाजसेवेचा एक मोलाचा संदेश देण्यात आला.
प्रमुख उपस्थितांची मांदियाळी
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष संतोष पवार तथा नगरसेवक ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक बाबासाहेब भागडे, सिनेट सदस्य डॉ. सागर वझे आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिकेत नाकाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांचा व कार्यकर्त्यांचा सहभाग
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप, युवा मोर्चा आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. यामध्ये प्रामुख्याने:
👉 नगरसेवक: अक्षय भिवदरे, प्रवीण चीमुरकर, सौ. मनिषा संजय दानव.
👉 प्रमुख पदाधिकारी :- महेश श्रीरंग,देविदास ताजणे , संजय दानव, अमित चवले, राहुल बांदुरकर, संजय राम, रमेश पर्वत, अमोल देऊळकर, अमोल शेंडे, सुरज केशवाणी, पंकज जाधव, मयुर मेहता, अजिंक्य नरडे, सुरज मेश्राम, श्रीकांत आत्राम, रवी गोडस्कर, राहुल डागमवार.
यावेळी महिला आघाडी व विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा समाजसेवेचा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला. ‘जय श्रीराम’ आणि ‘पवनपुत्र हनुमान की जय’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
🙏 जय विदर्भ 🙏




