वरोरा तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन
वरोरा :- अभिषेक किशोरराव भागडे
पंचायत समिती वरोरा अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा महोत्सव २०२६ चे उद्घाटन सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चरूरखटी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. हा महोत्सव दिनांक २ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला लोकप्रिय व युवा तडफदार हे अध्यक्षस्थानी मा. श्री. करणदादा देवतळे, आमदार वरोरा–भद्रावती विधानसभा क्षेत्र
मा. अश्विनी सोनवणे (केळकर), शिक्षणअधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती वरोराचे सभापती, उपसभापती, विविध शासकीय अधिकारी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, बँक अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्य, सांस्कृतिक कला, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतील, असा विश्वास मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी खेळासोबतच संस्कृतीची जपणूक करावी, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, शिक्षकवृंद व स्वयंसेवकांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन मा. कु. कुमुदिनी गोवर्धन, मुख्याध्यापक कर्मवीर विद्यालय, चरुरखटी यांच्या हस्ते करण्यात आले.
GMR कंपनी, WCL कंपनी ने या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत चरुरखटी येथील सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत, नृत्य, नाट्यछटा व सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.
तसेच बुधवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता पार पडणार असून या बक्षीस वितरण व निरोप समारंभात विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात येनार आहे.
बक्षीस वितरण कार्यक्रमात मा. श्री. शरद पारखी, बाल विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा हे बक्षीस वितरक म्हणून उपस्थित होनार. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. गजानन हटवार, कृषी अधिकारी पंचायत समिती वरोरा हे उपस्थित राहणार आहे.
या संपूर्ण महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमधील कलागुण, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्तीला चालना मिळाली, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक, शिक्षकवृंद व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
आपले विनीत :-1) गजानन मुंडकर गटविकास अधिकारी पंचायत समिती वरोरा
2) मा. कु. शुभांगी पिजदुरकर गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती वरोरा व इतर
🙏जय विदर्भ 🙏
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️8329889732




