वरोऱ्यात रक्तदानातून माणुसकीचा जागर; घुमे संस्थेचा ठोस सामाजिक प्रहार
स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य आणि अनुकरणीय उपक्रम
वरोरा : ✍🏼अभिषेक भागडे
आजही रक्ताअभावी रुग्णांचे प्राण धोक्यात येत असताना वरोरा येथे स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेत समाजाला आरसा दाखवणारा ठोस सामाजिक उपक्रम राबवला. संस्थेचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संजय दानव यांच्या वाढदिवसानिमित्त व स्व. पुष्पलता मारुती घुमे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रविवार, २५ जानेवारी रोजी श्री गुरुदेव सेवा मंडळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सागर वझे व नगरसेविका मनीषा संजय दानव यांच्या शुभहस्ते पार पडले. “रक्तदान ही केवळ औपचारिकता नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे,” असे ठणकावून सांगत मान्यवरांनी नागरिकांना निष्क्रियतेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मारोती घुमे, उपाध्यक्ष संजय दानव, सचिव आशिष घुमे, पत्रकार सारथी ठाकूर, अभिषेक भागडे( स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल,वरोरा संपादक ) सामाजिक कार्यकर्त्या छाया चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक संतोष पवार, प्रवीण चिमुरकर, अक्षय भिवदरे यांनी भेट देत उपक्रमाचे खुलेआम कौतुक केले. सामाजिक कार्यकर्ते भरत तेला, सचिन तडस, मंगेश पिसाळ, संजय गयनेवार यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनामागे प्रशांत साळवे, चेतन बुरडकर, नूतन बुरडकर, फिरोज शेख, सुनील इंगळे, आशिष करडभूजे, शंकर आत्राम यांनी घेतलेले अथक परिश्रम मोलाचे ठरले. नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून समाजहितासाठी पुढाकार घेतल्याने हा उपक्रम यशस्वी व प्रेरणादायी ठरला.
👉 केवळ भाषणांपुरते समाजकार्य न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून समाजाला दिशा देणाऱ्या या उपक्रमामुळे वरोरा शहरात सामाजिक बांधिलकीचे ठोस उदाहरण निर्माण झाले आहे.
🙏🏻जय विदर्भ 🙏🏻
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9573574711
☎️8329889732




