⭕🙏 आनंद निकेतन महाविद्यालयाच्या खेळाडूंना राज्यस्तरा वर बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण व कांस्यपदक 🙏⭕

 

आनंद निकेतन महाविद्यालयाच्या खेळाडूंना राज्यस्तरावर बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण व कांस्य पदक

वरोरा : अभिषेक भागडे
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या वतीने मूर्तीजापुर (जि. अकोला) येथे दिनांक २० ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आनंद निकेतन महाविद्यालयाच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करत चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

या स्पर्धेत आनंद निकेतन महाविद्यालयाची इयत्ता बारावीची विद्यार्थिनी कु. सलोनी कुंभारे हिने ६० ते ६५ किलो वजनगटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथमच तिला राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचे मानांकन प्राप्त झाले आहे. कु. सलोनी कुंभारे आगामी होणाऱ्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बंगळूरू (कर्नाटक) येथे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

त्याचप्रमाणे, गेल्या सहा वर्षांपासून बॉक्सिंग खेळाचा सातत्यपूर्ण सराव करणारी दिशा सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. गार्गी भोयर हिने या स्पर्धेत कांस्यपदक पटकावत चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

या यशामागे खेळाडूंना नियमित प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक पंकज शेंडे, तसेच महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. तानाजी बायस्कर, श्री सचिन साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. खेळाडूंच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या यशाबद्दल महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, विश्वस्त श्री कौस्तुभ आमटे, सौ. पल्लवी आमटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य प्रा. राधा सवाने, डॉ. विजय पोळ, श्री सुधाकर कडू, तसेच संपूर्ण विश्वस्त मंडळाने खेळाडूंचे अभिनंदन केले.
यासोबतच विजय डोबाळे (राज्य क्रीडा मार्गदर्शक), चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. बी. प्रेमचंद, महाराष्ट्र बॉक्सिंग अ‍ॅडहॉक कमिटीचे समन्वयक डॉ. राकेश तिवारी, लता इंदूरकर, सचिव श्री बंडावार, प्रा. संगीता बंबोडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

🙏जय विदर्भ 🙏

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा.

☎️ 9673574711

☎️ 8329889732