संजय दानव यांच्या जन्मदिवसानिमित्त वरोऱ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

वरोरा :वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा चे उपाध्यक्ष संजय दानव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस सेवा कार्यातून साजरा करण्याचा हा स्तुत्य उपक्रम नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.हे रक्तदान शिबिर स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा व अमन ब्लड बँक, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले असून,रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत,गुरुदेव सेवा मंडळ, कॉलरी वॉर्ड, वरोरा येथे हे शिबिर संपन्न होणार आहे.रक्ताची वाढती गरज लक्षात घेता, रक्तदान हे सर्वोत्तम दान मानले जाते. या शिबिरातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार असून, समाजासाठी योगदान देण्याची सुवर्णसंधी नागरिकांना प्राप्त होणार आहे.तरी सर्व निरोगी वरोरावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून या मानवतावादी उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.