⭕🙏 हळदी -कुंकू चा व महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला🙏⭕

 

वरोरा : अभिषेक भागडे

॥ श्री संत शिरोमणी नामदेव महाराज ॥ यांच्या पावन स्मरणार्थ संत शिरोमणी नामदेव महाराज मंडळ, वरोरा यांच्या वतीने वरोरा शहरातील सर्व महिला व समाजातील भगिनींसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम व सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम दि. 23 जानेवारी 2026 रोजी दरवर्षीच्या परंपरेनुसार आयोजित करण्यात येत असून, यावर्षी विशेष आकर्षण म्हणून कु. मृणाल बहादे यांचा केळवण कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे. महिलांमध्ये आपुलकी, स्नेह आणि सामाजिक एकोपा वाढावा या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे

या प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. अर्चनाताई आशिष ठाकरे या प्रमुख उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन व शुभेच्छा देणार आहेत. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित महिलांसाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सौ. शीतल अजय कटराईत यांच्या घरी, गिरीवीहार, शालिमार ट्रेडर्सच्या मागे, भोयर हॉस्पिटलजवळ, वरोरा येथे पार पडणार आहे. सौ. प्राजक्ता मनोज कोहळे अध्यक्ष तालुका शिंपी समाज शितल कटाईत,मीनल बिडवाईक,प्रतिभा कटाईत,कल्याणी जुमडे,ज्योती कटाईत, दीपा कोहळे दिपाली देवगिरीकर

या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात वरोरा शहरातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वैष्णव शिंपी समाज महिला मंडळ, वरोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

🙏🏻जय विदर्भ🙏🏻

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️9673574711 ☎️ 8329889732